नागपूर: ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. दुपारी ४ वाजता त्यांच्या सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वादग्रस्त ठरलीत.
प्रा. मा.म. देशमुख हे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीट उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांची चिकित्सक वृत्ती असल्याने ते इतिहासातील सत्यता बाहेर काढायचे. १९५४-१९६३ नागपूर पर्यंत नागपूर महापालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६४ नंतर धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १ ऑगस्ट १९९६ ला सेवानिवृत्त झाले.
प्रा. मा. म. देशमुख यांनी यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये शिवशाही, सन्मार्ग, राष्ट्र निर्माते , मनुवाद्यांशी लढा, रामदास आणि पेशवाई, मराठा- कुणबी दशा आणि दिशा, बहुजन समाज आणि परिवर्तन, समाजप्रबोधन, शिवराज्य, साहित्यिकांची जबाबदारी, शनिवार वाडा बाकी आहे, वंश, भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य, जय जिजाऊ , प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा यासारखे अनेक ग्रंथ लिहिलेत.
नवीन इतिहासाची मांडणी करणे, बहुजन जागृतीसाठी आपल्या लेखणीतून त्यांनी नवीन दालन उघडले. लेख • भाषणे देऊन बहुजनांमध्ये जनजागरण केले. मध्ययुगिन भारताचा इतिहास या ग्रंथाचा माध्यमातून राजकीय, सामाजिक, संशोधन साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविला होता. बहुजन समाज व चळवणीची मोठी हाणी झाली झाल्याने खंत व्यक्त होत आहे.