नागरिकांच्या सोईसाठी व बँकिग सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल, 2025 पासून धुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच सहकारी बँकांच्या शाखांचे कामकाज सकाळी 10.00 वाजता सुरु होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईसाठी व बँकिग सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने 1 एप्रिल, 2025 पासून सर्व बँक शाखांसाठी हे वेळापत्रक लागू करण्यात येत आहे. या निर्णयामुळे नागरिकांना बँकेशी संबंधित व्यवहार अधिकार सोयीस्कर व सुरळीत करता येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार धुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच सहकारी बँकांच्या शाखा सकाळी 10.00 वाजता सुरु होईल.
सर्व बँक ग्राहकांनी व संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी व त्यानुसार आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे. अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित बँक शाखेशी संर्प साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे.