धुळे तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारीआरक्षण सोडत

धुळे तालुक्यातील अनुसुचीत क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायती करीता अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता सन 2025-2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, 7 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, धुळे ग्रामिण येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या ग्रामपंचायतीची होणार आरक्षण सोडत

अजंग / कासविहीर, अजनाळे, अनकवाडी, अंचाळे, आर्वी, अकलाड, आमदड / वजीरखेडे, आर्णी, आंबोडे, इसरणे, उभंड, उडाणे, कापडणे, काळखेडे, कावठी, कुळथे, कुंडाणे (वरखेडी), कुंडाणे (वार), कुसुंबा, कुंडाणे (वेल्हाणे), कौठळ, खेडे/ सुट्रपाडा, खोरदड, खंडलाय खु., खंडलाय बु., बांबुले प्र. नेर, गरताड, गोताणे गोंदुर, चिंचखेडे, चिंचवार, चांदे, चौगाव / हिंगणे, जुनवणे, जापी, जुन्नेर, तरवाडे, तिखी, मोरदडतांडा, अंचाळेतांडा, दहयाणे, दापुरा/दापुरी, देवभाने, देऊर बु., दोंदवाड, देऊर खु. धनुर / लोणकुटे धमाणे/ धमाणी/ धोडी, धामणगाव, धाडरा धाडरी, नरव्हाळ, नगाव/ तिसगाव/ वडेल/ ढंढाणे, नवलाणे, नाणे, नावरा, नावरी, निमडाळे, न्याहळोद, निकुंभे नेर/म.पांढरी वैगरे निमगुळ, नंदाळे बु., नंदाळे खु. नांद्रे/पुनितपाडा, नंदाणे, पाडळदे, पिंपरखेडे, पुरमेपाडा, फागणे, बल्हाणे, बाबरे, बाभुळवाडी, बिलाडी, बुरझड, बेहेड, बोरसुले / नवेकाठारे बेंद्रेपाडा, बोरीस, बोदगाव/वणी खु. बोरविहीर, बोरकुंड, होरपाडा, रतनपुरा, भदाणे, भिरडाणे/ भिरडाई, मळाणे, मुकटी, मेहेरगाव, मोरदड, मोराणे प्र.नेर, मोहाडी प्र.डा., मोरशेवडी, मोघण, मांडळ, रामी, रावेर, रानमळा, लळींग / दिवानमळा, लामकानी, लोहगड, लोणखडी, वडणे, वडजाई, वणी बु., वडगाव, वार, विश्वनाथ/सुकवड, विंचुर, वेल्हाणे बु., शिरुड, शिरधाणे प्र. नेर, शिरधाणे प्र.डा. सडगाव / हॅकळवाडी, सरवड, सावळदे, सावळी / सावळीतांडा, सायने, सातरणे, सांजोरी, सिताणे, सैताळे, सोनगीर, सौंदाणे, सोनेवाडी, हडसुणी, हेंद्रुण, हेकळवाडी/तामसवाडी, तांडा (कुंडाणे), नवलनगर, निमखेडी, या गावातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे.

धुळे तालुक्यातील सर्व पक्ष प्रमुख, स्थानिक स्वराज सस्थांचे सदस्य / पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे. असे आवाहन तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top