घराच्या वाटणीतून निर्माण झालेला वाद ठरला जीवघेणा; तरुणाचा खून, वडील व भावाला अटक

भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल लोटन पाटील (वय ५४), व्यवसायाने शेतकरी व पोलिस पाटील, रा. बाळद खुर्द यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बाळु राजेंद्र शिंदे (वय २६) याने घराच्या वाटणीत अधिक हिस्सा मागितल्यामुळे संशयितांनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. चेहऱ्यावर व छातीवर जोरदार वार करून त्यास जीवंतपणे ठार करण्यात आले.

या घटनेनंतर भडगाव पोलीस स्टेशनने तातडीने कारवाई करत संशयित भारत राजेंद्र शिंदे (वय २२) आणि राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) — हे दोघेही बाळद खुर्दचे रहिवासी असून, बाळुचे भाऊ आणि वडील आहेत — यांना अटक केली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top