शिरपूर तालुक्यातील पिंपळे ( होळनांथे) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे यास आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सातबारा उताऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी त्यांनी ही मागणी केली. तक्रारदाराने धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचून तलाठी बोरसे यास 800 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई उप अधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, भूषण खलाणेकर, प्रशांत बागुल, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, संदीप कदम, संतोष पावरा, गायत्री पाटील, वनश्री बोरसे आदींनी ही कारवाई केली
