धुळे जिल्हा शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जगदिश सुर्यवंशी यांची मागणी
धुळे – फेसबुक वर ‘वेद कुमार‘ व ‘गणेश मोहन कराड‘ या खात्याद्वारे चालविला जाणारा ‘देवेंद्र फडणवीस‘ या नावाचा ग्रुपवर शिवसेना पक्ष, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबियां विरूध्द बदनामी करण्यात आली आहे. या संदर्भात धुळ्यात जिल्हा शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जगदिश सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बदनामी आणि देशद्रोहासारखा गुन्हा करणा-यां विरूध्द कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.
उध्दव ठाकरे यांच्या फोटोची मॅार्फींग करून भारत देशाची एकात्मता खंडीत होईल, जातीय तेढ निर्माण होईल, प्रांतिक वाद निर्माण होईल अशा उद्देशाने भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र राज्य, ओबीसी मोर्चा सेक्रेटरी या पदाद्वारे चालविले जाणारे ‘गणेश मोहन कराड‘ व ‘वेद कुमार‘ या नावाचे खाते चालविणा-या विरूध्द तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धुळे जिल्हा शिव विधी व न्याय सेनेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट पोलिस निरिक्षक, सायबर सेल धुळे जिल्हा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी गांभीर्याने दखल घेवून तात्काळ कारवाई करू, असे आश्वासन शिव विधी व न्याय सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. . या वेळी धुळे जिल्हा शिव विधी व न्याय सेनेचे उपाध्यक्ष अॅड.प्रमोद गावडे, सरचिटणीस अॅड. सनतकुमार पाटील, चिटणीस अॅड.सतिश मुसळे, धुळे तालुका अध्यक्ष अॅड.कैलास माळी, धुळे तालुका सचिव अॅड.राहुल माळी, अॅड.संदिप खैरनार, अॅड. यश येवलेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यासाठी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धिरज पाटील, विधानसभा संघटक ललित माळी, जिल्हा युवासेना प्रमुख हरिष माळी यांचे सहकार्य मिळाले.