नाशिक-औरंगाबाद रोडवर पहाटे 4/4.30 दरम्यान हॉटेल मिर्ची जवळ खाजगी बस चा मोठा अपघात झाला. यात बस पूर्ण जळून खाक झाली.बस मधील 30 पैकी किमान 15 प्रवासी जळुन ठार झाल्याचा संशय असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.उर्वरीत प्रवास्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मृत पावलेल्या व्यक्तिंना 5 लाख रुपयांची मदत आणि ईतर अपघातात जखमी झालेल्या लोकांना सरकारी खर्चाने उपचारासाठी मदतची घोषणा केली असून पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.