पहलगाम दुर्घटना: धुळे जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर, धुळे जिल्ह्यातील कोणताही पर्यटक बाधित नसल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या यादीच्या आधारे ही माहिती निश्चित करण्यात आली आहे.

या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तत्काळ पावले उचलत मंत्रालयात राज्य नियंत्रण कक्ष तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक ती मदत त्वरित मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी खालील मदत क्रमांकांवर संपर्क साधावा:

📍 काश्मीर (श्रीनगर) आपत्कालीन नियंत्रण कक्ष:

  • दूरध्वनी: 0194-2463651 / 2457543
  • व्हॉट्सॲप: 7780805144 / 7780938397

📍 राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय, मुंबई):

  • दूरध्वनी: 022-22027990 / 22794229
  • भ्रमणध्वनी: 9321587143

📍 जिल्हा नियंत्रण कक्ष, धुळे जिल्हाधिकारी कार्यालय:

  • दूरध्वनी: 02562-288066
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे:
    • भ्रमणध्वनी: 8698862890 / 8788762871

धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या नातेवाइकांचा काश्मीरमधील संपर्क तुटल्यास किंवा मदतीची गरज असल्यास वरील नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top