रावेर एमआयडीसी साठी जागा मिळावी -पालकमंत्री जयकुमार रावल व आ. अनुप अग्रवाल यांची मागणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

धुळे जिल्हातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून आता जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी एमआयडीसीचा विकास करणे आवश्यक आहे. नरडाणा एमआयडीसी बरोबरच रावेर एमआयडीसीचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.रावेर एमआयडीसी च्या विकासासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

रावेर एमआयडीसीच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व अधिकारी उपस्थित होते.

रावेर एमआयडीसी चा विस्तार करण्याचा विषय अनेक दिवसापासून प्रलंबित होता. गट नंबर 80 व गट नंबर 11 2017 एकर जागा रावेर एमआयडीसी करता उपलब्ध होणार असून यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे प्रयत्नशील होते आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रावेर एमआयडीसीला जागा देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला केलेत. पंधरा दिवसाच्या आत वन विभागातून सदरचे नोटिफिकेशन काढून सदर जागा महसूल विभागात हस्तांतरण करून ती जागा उद्योगांना उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

जागा ही बऱ्याच कालावधीपासून एमआयडीसी कडे वर्ग करण्यासाठी प्रलंबित होती पण याचा पाठपुरावा कोणीही आजपर्यंत केलेला नाही याबाबत पालकमंत्री जयकुमार रावल व आ. अनुप भैय्या अग्रवाल साहेब यांनी सतत पाठपुरा करून या जागेचा प्रश्न तीन महिन्याच्या आत धडाडीने लावून धरला विविध ठिकाणी बैठका घेतल्या.

बैठकीच्या अनुषंगाने आज महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तथा माननीय जयकुमार जी रावल साहेब पालकमंत्री धुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत वन विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत असे ठरले की पंधरा दिवसाच्या आत सदर जागेचे नोटिफिकेशन काढून सदा जागा ही एमआयडीसी कडे हस्तांतरणाची कारवाई करण्यात यावी व वर्ग होताच उद्योगांना ही जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल या ठिकाणी मोठ मोठे उद्योग येतील व धुळ्याच्या प्रगतीमध्ये भर पडेल चे लोकेशन हे भौगोलिक रित्या उद्योगांसाठी चांगले आहे या ठिकाणाहून बरेच राष्ट्रीय महामार्ग जातात डोळ्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे तसेच रेल्वे मार्ग देखील उपलब्ध आहे धुळ्याला जोडणारा नवीन मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रगतीपथावर आहे या सर्व बाबींचा विचार होऊन या ठिकाणी उद्योगासाठी जागेची अडचण सोडवण्याचे धडाडी प्रयत्न माननीय आमदार अनुप भैय्यासाहेब अग्रवाल यांनी केल्याने सदर जागा धुण्यासाठी लवकरच उपलब्ध होईल याबाबतीचा निर्णय सकारात्मकरीत्या घेण्यात आला….
उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश–
धुळ्याचे बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी तसेच एमआयडीसी अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये फार्मिंग सोसायटींना देण्यात आलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर फार्मिंग सोसायट्यांकडून गौण खनिज चे उत्खनन झाल्याने मंत्री महोदयांनी निर्देश दिले की सदरचे उत्खनन केलेल्या सोसायट्याना वर गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांच्यावर गौण खनिजांची दंडाची रक्कम वसूल करण्याचे देखील निर्देश मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना दिले यावेळेस माननीय मंत्री महोदयांनी सदरचे शर्तभंग म्हणजे त्यांना कोणत्याही अधिकारांना सदा सोसायटी गिअर कानूने पद्धतीने गोणखणीचे उत्खनन करून शासनाचे नुकसान केले आहे याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना 28 तारखेच्या अगोदर सदर कारवाई करण्याचे निर्देश दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top