करोनाच्या नवीन व्हेरीयंटपासून वाचण्यासाठी मदत करतील ही ७ उपकरणं

चीनमध्ये पुन्हा करोनाचे उद्रेक होत आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या भारतामध्ये करोनाचा काही धोका नसला तरीदेखील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून गर्दीच्या ठीकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय नागरिकांनी करोनाबाबत सावधानता बाळगावी असेही सांगण्यात आलं आहे.

करोनापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी तुम्ही आतापासून काही वैद्यकीय उपकरणे खरेदी करु शकता. जी तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबतच्या अनेक अपडेट घरबसल्या देऊ शकतात. तर काही उपकरणांच्या मदतीने तुम्ही करोना नियंत्रणातही ठेवू शकता ती उपकरणं कोणती आहेत याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पल्स ऑक्सीमीटर –

रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे एक करोनाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी स्थिर आहे की नाही हे तपासणं गरजेच आहे. तुम्ही पल्स ऑक्सिमीटरच्या साह्याने SpO2 च्या लेवल मोजू शकता. जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना त्याची कल्पना घेऊ शकता.

डिजिटल ब्लड मॉनिटर –

सामान्य रक्तदाब श्रेणी ८०-१२० mm Hg च्या दरम्यान असते. ती कमी जास्त झाल्याचं तुम्ही डिजिटल ब्लड मॉनिटरच्या मदतीने मोजू शकता.

डिजिटल IR थर्मामीटर –

शरीराचे तापमान IR थर्मामीटरने संपर्करहित पद्धतीने मोजता येते. या थर्मामीटरच्या मदतीने तुम्ही १-२ इंचाच्या अंतरावरून शरीराचे तापमान मोजू शकता. यामुळे क्रॉस इन्फेक्शनची शक्यता कमी होते.

ग्लुकोमीटर –

ग्लुकोमीटर (Glucometer to track blood glucose levels) हे सर्वांसाठी आवश्यक नसलं तरी ते मधुमेहाच्या रुग्णासाठी गरजेचं असतं. मधुमेहाच्या रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासने आवश्यक असते. त्यासाठी ग्लुकोमीटरची गरज भासू शकते.

स्टीमर –

स्टीमरचा वापर सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी केला जातो. स्टीमरमधून येणाऱ्या गरम वाफेमुळे घशाची जळजळ कमी होते.

नेब्युलायझर मशीन –

या मशीनचा वापर जलद गतीने फुफ्फुसात ऑक्सिजन देण्यासाठी केला जाऊ शकतो. स्टीमरच्या विपरीत, नेब्युलायझर थंड वाफ देते.

सेल्फ-क्लीनिंग मास्क –

सेल्फ-क्लीनिंग मास्क अँटीबैक्टीरियल-कोटिंगसह येतात. त्यांचा पुन्हा-पुन्हा वापर केला जाऊ शकतो. या मास्कमुळे वैद्यकीय कचरा कमी होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares