पारोळा : जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगावात रस्ते अपघातात दोन मित्र मृत्युमुखी झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडलीय. पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात पालिका अभियंता आणि डॉक्टर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ही घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. मृतांमध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल सौपुरे (३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश मंगळे (३५ रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. या अपघातात संदीप पवार ३७, रा.आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत.
शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.