राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जोरदार खडाजंगी बगायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण जबरदस्त पणे तापले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “विरोधकांचे बॉम्बस्फोट नसून लवंगी फटाकेही नव्हते, आमच्याजवळ ही भरपूर बॉम्ब आहेत”, असं फडणवीसांनी म्हटल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी टीकास्र सोडलं आहे.
संजय राऊत म्हणाले
“कधीकाळी फडणवीस विरोधी पक्षात होते. तेव्हा त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला. एकनाथ खडसे असतील, फडणवीस असतील किंवा त्यांचे इतर सहकारी यांनी त्या काळी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आणले. मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. पण आज सत्तेत असताना त्यांना विरोधी पक्ष काढत असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाकेही वाटत नाहीत. एवढे बदलले आमचे फडणवीसजी?” असा प्रश्न संजय राऊतांनी केला आहे.