“…तर कसबा पोटनिवडणूक लढवणार”; NCP च्या रुपाली पाटील-ठोंबरेंचं विधान! म्हणाल्या,

पुणे :येथे कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी या जागेवरुन पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच २०१९ साली अगदी ऐनवेळी आपलं तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कापलं होतं असंही रुपाली पाटील-ठोंबरेंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थाचं विधान करताना त्यामागील कारणाबद्दलही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सोमवारी पत्रकारांशी संवाद साधतांना रुपाली पाटील-ठोंबरेंनी, “कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई यांचं निधन झालं आहे. त्या आजारी होत्या. त्याच्याऐवजी जी पोटनिवडणूक लाढणार आहे त्यामध्ये पक्षाने जर आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. पण ही पोटनिवडणूक जाहीर झाली पाहिजे. आम्ही तर तयार आहेत पक्षाच्या आदेशासाठी. पक्षाने आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत,” असं म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares