धुळे : शहरा जवळील मुंबई-आग्रा मार्गावर वरखेडी रोडावरती दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक ला अचानक आग लागली अग्निशमन दलाने आगीला नियंत्रणात आणले. मात्र ट्रकचे काही टायर , बॉडी , केबिन मधील सीट जळून खाक झाले. अग्निशाम दलाने आगीला वेळीच नियंत्रणात आणले.
सकाळी १० वाजेच्या सुमारास वरखेडी रोड वरील डेपो पुढे कर्नाटक राज्याकडून गुजरात राज्यातील हितेश कुमार हा ट्रक ने जात होता.पण वरखेडी रोडवरील कचरा डेपो जवळ ट्रक ला आग लागली. ट्रक मधील दगडी कोळशाने पेट घेतली. छोट्या चिंगारीचे भीषण आगीत रूपांतर झाले. चालकाला आगी मुळे उठलेल्या धुराचे लोट दिसताच चालकासह परिसरातील लोकांनी अग्निशमन दलास कळविले. आगीच्या घटने मुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाले. वाहतूक पोलिसांसह आझादनगर पोलिसांनी यावर नियंत्रण मिळविले.