नाशिक येथे एकाची आत्महत्या सुसाइड नोटमध्ये लिहले भाजप पदाधिकाऱ्यांची नावे

नाशिक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिकमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आला आहे. या घटनेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये या घटनेचीच चर्चा आहे.

नाशिकमध्ये एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केली आहे. अनिरुद्ध धोंडू शिंदे, असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजप नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडी पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. वरील दोघांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. संशयित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिकमधून फरार होता. मागच्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविकेचे पुत्र भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरून हल्ला करून खंडणी मागितल्या प्रकरणी अनिरुद्ध शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होता. दरम्यान, अनिरुद्ध शिंदे यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares