कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना फडणवीसांकडून क्लीन चिट

    टीईटी घोटाळा, गायरान घोटाळा, व सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटींच्या वसुली प्रकरणात विरोधकांनी हल्लाबोलऐवजी नरमाईचे धोरण अवलंबल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात सत्तार यांनी निवेदन करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आपण कुठलेही नियमबाह्य काम केले नसून कोर्ट देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहाेत, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळली. 

टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याप्रकरणी विचारणा करणारा अजित पवारांचा प्रश्न विधानसभा नियम ३५ अ आणि उपकलमांन्वये नाकारल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला. यावर उपमुख्यामंत्रीनी विरोधकांना टार्गेट करत, ‘हा घोटाळा तुमच्याच काळात झाला होता.असे म्हटले. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares