जळगाव : भुसावळच्या परिसरात ग्राहकांच्या घरातील वीज मीटरचे चुकीचे रिडिंग घेतले जात असून वीज बीलांच्या वाटपात दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर ग्राहकांना वीज बिलांचे वाटप केले जात असल्याची तक्रार शहरातील ग्राहकांनी केली आहे. प्रत्येक महिन्यात चुकीचे रिडींग देऊन ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरूच असल्याने चुकीचे मीटर रिडींग देणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकड्न करण्यात आली. चुकीच्या देयकांमुळे ग्राहक विज बिल भरणा करीत नाही.
अचूक बिलिंगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे गेल्या दोन महिन्यांत बिलिंग व रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे, असे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले होते, मात्र भुसावळात रिडिंगमध्ये सुधारणा झालीच नाही, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहक संतप्त झाले , महावितरणचा दावा फोल ठरला असल्याचे मत प्रा.धिरज पाटील यांनी व्यक्त केले आहे.