तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात .. चोपडा तहसिल कार्यालय आवारातील घटना..
चोपडा दि.१६(प्रतिनिधी :- समाधान कोळी
जळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोपडा तहसिल कार्यालय आवारात सापळा रचून दहा हजारांची लाच घेतांना देवगाव सजाचे तलाठी भूषण विलास पाटील यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी लाचेची मागणी तलाठ्यांस चांगलीच महागात पडली आहे. तरी चोपडा विभागात मलाई खाणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असल्याने एक नवी डोकीदुखी निर्माण होऊ पाहत आहे.तरीअशा मलाईची चव चाखणाऱ्यांना अद्दल घडावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,
तक्रारदार- पुरुष,वय-३४, रा.मितावली. ता.चोपडा जि.जळगाव यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर असून सदर ट्रॅक्टरवरती तापी नदीमधुन वाळू वाहतूक करू देणेसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी भुषण विलास पाटील,वय-32 व्यवसाय-नोकरी, तलाठी, तलाठी कार्यालय देवगाव सजा.
रा.पंकज नगर,चोपडा, ता.चोपडा,जि.जळगाव. यांनी दरमहा 10,000/-रुपये प्रमाणे लाचेची मागणी करून पहिला महिन्याची रक्कम 10,000/-रु.लाचेचा हप्ता आज दि.16/02/2022रोजी तहसिल कार्यालय चोपडा आवारात स्वीकारतांना जळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडून पंचासमक्ष रक्कम हस्तगत केली.हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
हि धडाकेबाज कामगिरी पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांच्या नेतृत्वाखालील
तपास अधिकारी-*
संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक,अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव व मदत पथकातील
, PI.एन.एन.जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ. यांनी केली.
सदरील कारवाई मार्गदर्शक-
** मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
** मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*, मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईने लाच घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.उपरोक्त कारवाई बद्दल लाच लूचपत प्रतिबंध विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.