नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने राज्यात प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थाचा एक कोटी हून जास्त रुपयांचा साठा जप्त केला.अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी छापेमारी केली. संबंधित विभागाच्या पथकाने वाडीवऱ्हे परिसरात संशयित वाहनाचा पाठलाग करत कंटेनरांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. पैकी एका वाहनातून संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. एका कंटेनरमधून एक कोटी रुपयांचा तर, दुसऱ्या वाहनातून ४५ लाख, ३३ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही कंटेनर मिळून एकूण एक कोटी ४५ लाख, ३३ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आणि अंदाजे ३० लाख रुपयांचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Related Posts
दादा भुसे यांची सहकारमंत्र्यांशी चर्चा, बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
नाशिक : जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव…
नाशिक येथील दुर्घटनेत मोटारीत बनावट नव्हे तर खेळण्यातील नोटा
नाशिक : शहरातील एका स्विफ्ट डिझायर मोटारीने प्रथम दुचाकी, नंतर टाटा नेक्सन वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.…
धक्कादायक : पित्याने सहा वर्षाच्या आजारी मुलाला छताला टांगून केली मारहाण
चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली. ६ वर्षाच्या बालकास , तो आजारी असताना पित्याने छताला उलटे लटकावून…