उद्यापासून कॅलेंडर आणि वर्ष बदलणार आहे. दर वर्षी प्रमाणे २०२३ हे वर्ष सुद्धा टेक्नोलॉजीचं असणार आहे. यावर्षी खूप साऱ्या टेक कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. गुगल सध्या जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी आहे. वर्ष २०२२ मध्ये गुगलने २२ प्रोडक्ट्स आणि सर्विसेज लाँच केल्या आहेत.
२०२२ मध्ये गुगलची प्रमुख लाँचिंग मध्ये अँड्रॉयड १३ चा समावेश आहे. अँड्रॉयडला नवीन प्रायव्हसी फीच्स आणि नवीन मल्टी डिव्हाइस एक्सपीरियन्स सोबत आणले गेले आहे. पिक्सल फोनला अँड्रॉयड १३ चे अपडेट मिळत आहे.
गुगलने आपले दोन फ्लॅगशीप Pixel 7 आणि 7 Pro ला अनेक वर्षांनंतर भारतात लाँच केले आहे. या दोघे हि फोनला ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध केले आहे.
गाइडेड फ्रेम (Guided Frame) पिक्सल फोन कॅमेराचे हे एक खास फीचर आहे. जे अशा लोकांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. जे पाहू शकत नाहीत. हे फीचर यूजरला बोलून फ्रेम आणि कॉन्ट्रॉस्टसाठी माहिती देते. पाहू न शकणारे लोक सुद्धा चांगला फोटो क्लिक करू शकतात.
Google Tensor G2, Pixel Watch, Guided Frame, Chromecast, Nest WiFi Pro, Google Lens, असे अनेक प्रॉडक्ट्स गूगल ने २०२२ साली लाँच केले.