‘ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही’; रामदास आठवलेंचा टोला

भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी ही काही फरक पडणार नाही. ठाकरे, आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वर निशाणा साधला.

भीमशक्ती माझ्या पाठीशी असल्याने ठाकरे व आंबेडकर एकत्र आले तरी त्याचा राजकीय परिणाम फार होणार नाही. राज्यातले शिंदे सरकार भक्कम असून पूर्ण काळ टिकेलच, पण २०२४ मध्ये मोठ्या ताकदीने सत्तेवर येईल. संजय राऊत म्हणतात तसे सरकार अस्थिर नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० हून अधिक तर एनडीएचे ४५० खासदार निवडून येतील. राहूल गांधी पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची भारत जोडो यात्रा भारत तोडो असून अगोदर कॉंग्रेस जोडो यात्रा करायला हवी, असेही आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top