धुळे : शहरातील श्रीराम पेट्रोल पंप जवळ एक मध्यम वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. पंपा शेजारील सार्वजनिक
शौचालयाच्या मागील बाजूस ४५ वर्षीय विजय या हमाली काम करणाऱ्या इसमाचा
मृतदेह पडलेलाअसल्याचे बघून खळबळ उडाली. विजय यांच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्यामुळे त्याच्या हल्ला करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून शहरात हमाली करण्याचे काम करत
असल्याचे सोबतच्या कामगारांनी सांगितले. परिसरात नशा करणारे
अनेक लोक असून कोणीतरी खिशातून पैसे काढून घेतले किंवा अनैतिक संबंधातून त्यांना
मारले असावे ही अशी चर्चा आहे. अपर पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरिक्षक योगेश
राऊत, शहर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी पहाणी केली.