संभाजीराजे का झाले अजित पवारांवर आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने राज्यभरात रान पेटवल्यानंतर आज स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संभाजीराजे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच म्हटलंय. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केलं, ऐतिहासिक संदर्भ, घटना बोलायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचं विधान चुकीचं. स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते हे चुकीचं आहे.

‘मी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरवातीला संभाजीराजेंना धर्मवीर म्हणून मी संबोधतो. यापुढेही ते असेच राहणार आहे. अजित पवार म्हणतात संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. मात्र संभाजीराजे धर्मवीर आहेत याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुस्तकाचे वाचन करून ते फक्त स्वराज्य रक्षक म्हटलं हे सांगावे. अजित पवार अर्धसत्य बोलले आहेत. ऐतिहासिक संदर्भ देताना पुस्तके वाचून द्यावे,’ असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं.

काय म्हणाले होते अजित पवार?

‘आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर ही म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही, ‘असं वक्तव्य अजित पवारांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares