हिवाळी अधिवेशनात मागण्यामान्य न झाल्याने डॉक्टरांनी संपाला कालपासून सुरुवात केली. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. पण मात्र मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरात 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटल मधे इमर्जन्सी सेवा उपलब्द आहेत. प्राध्यापक,आंतरवासित डॉक्टरांना ओपीडी व वार्डामध्ये सेवा देण्यासाठी तैनात आहेत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खैराटकर, यांनी सांगितले आहे.
राज्यातील सर्व शासकीय किंवा पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडला आहे. म्हणूनच निवासी डॉक्टरांचे भविष्य ताटकळत आहे. अश्या या मागण्या करण्यात आले आहे.