मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे. ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचंच नव्हे तर देशाचं राजकारण बदललेलं दिसेल, अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत. याविषयी राऊतांना विचारलं असता, त्यांनी इतिहासाला उजाळा देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांच्या नात्याविषयी आठवणी जागवल्या.
संजय राऊत, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो असे प्रकाश आंबेडकर ज्यांच्या मागे मोठा वंचित समाज उभा आहे, असे नेते प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात अनेक जण एकवटले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कुणी रोखणार नाही, असेही म्हटले राऊत. यामुळे देशात परिवर्तन सुरू होइल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे खूप सकारात्मक असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात काम करताय, म्हणून आमची अशही इच्छा होती की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एकत्र यावी कारण ही महाराष्ट्रासह देशाची ताकद आहे, संजय राऊत.