नाशिक : शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशा मुळे आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत. पक्षप्रवेशावरती ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे गटात जे गेले त्यांची नावे कोणालाही माहिती नाही आहे. ते आज नाशिक दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले “शिवसेनेत न दोन-चार दलाल, ठेकेदार गेले असतील. पण मात्र शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी, शिवसैनिक, शिवसेना, जागेवर आहेत”. असे संजय राऊत म्हणाले.
