राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकच आहे. एकच राहील. गट तट हे तात्पुरते आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्षाचे बीज रोवले. त्या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना संपुर्ण महाराष्ट्राचा अशिवार्द आहे. शिवसेना महावृक्ष आहे. महावृक्षाचा पालापाचोळा पडतो. ते लोक उचलून नेतो. पालापाचोळा जाळून त्यांचा वापर शेकोटीसाठी केला जातो.
अधिवेशनात अनेक प्रकरणे समोर आली. 6 मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले. पुरावे मिळूनही एकावरही कारवाई झाली नाही. मात्र गेंड्याची कातडी पांघरल्यागत सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्यात बसलेल्या म्हशीप्रमाणे जणु काही घडलेच नाही, या अर्विभावात सरकार आहे. पण टीका केवळ विरोधी पक्षावर झाली. आंदोलन करणारी पिढी बदललली पण आंदोलन सुरूच राहतील.असे ही म्हणाले