राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली. यावर आमदार रोहित पवार यांचे क्रिकेटमधील योगदान काय, हे समजले नाही, अशी टीका भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केली आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण मात्र, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड होण्यामागे त्यांचे क्रिकेटमध्ये रोहित पवार यांचे नेमके योगदान काय आहे ते मात्र समजले नाही. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. निलेश राणे यांनी म्हटले आहे की, आमदार रोहित पवार यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया आता.
Related Posts
शिंदखेडा मतदार संघात शिवसेनेचा झंझावात निर्माण करा…रविन्द्र मिर्लेकर
शिंदखेडा :- मतदार संघातील गावागावात शाखा निर्माण करा, कार्यकर्त्यांची संख्या वाढवा , संपूर्ण तालुक्यात सेनेचा झंझावात निर्माण करा, असे आवाहन…
स्मृती इराणी यांची शिरपूरमध्ये महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
“ना कोई टक्कर मे, है ना कोई चक्कर मे है.” असे स्मृती इरानींचे विधान“भाजपाला न चुकता मतदान करा” असे आवाहन…
धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी 43 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल
धुळे, दिनांक 28 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन…