नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात बस थेट रस्त्यावरून उलटली बस उलटल्याने १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर २ जण गंभीर असल्याची माहिती मिळाली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाण्याहून ही बस त्र्यंबकेश्वर ला जात असताना बस रस्त्याच्याकडे जाऊन उलटली. भाविकांच्या बस अपघातात १३ जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.