काँग्रेस नेते जयप्रकाश छाजेड यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

नाशिक : काँग्रेसचे माजी आमदार व इंडियन नॅशनल ट्रेड युनियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अचानक छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना नाशिक मधील सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांची पत्नी व नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड व तीन मुले असा परिवार आहे. वयाचा ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छाजेड हे नागपूर येथे होणाऱ्या पक्षाच्या एका बैठकीसाठी निघाले होते. बैठकीला पोहोचण्याआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छाजेड यांच्या निधनाबद्दल काँग्रेस नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

 महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. इंटक या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष तर राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. आ‍ॅ‍ॅल इंडिया काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. नाशिकच्या राजकीय व सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares