महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी बैठक घेतली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील संभाव्य युतीबाबत चर्चेला सुरुवात झाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिंदे गट भाजपची साथ सोडत असेल तर त्यांच्यासोबत आम्ही युती करायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली ला भेट झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि शिंदे गट व भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आज पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी काल दिल्लीत असताना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून फोन आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मी संध्याकाळी भेट घेतली. भेटीत विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्याशी अडीच तास चर्चा केली.
शिंदे गट व भाजपसोबत युती करण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत स्पष्ट केले, महाराष्ट्रातील पुढील निवडणुका आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढवणार आहोत. प्रकाश आंबेडकर असेही म्हणाले, भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासोबत आमचे वैचारिक भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्धवस्त केली, ज्या व्यवस्थेत बदल घडवून आणला तीच व्यवस्था भाजप आणि आरएसएस पुन्हा आण्यास इच्छित आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करणे आमच्या नैतिकतेत बसत नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले, पण त्यांच्या युतीचा जाहीर पणे अजून पर्यंत खुलासा झालेला नाही