शिरपूर : येथे पोलिसांनी सहा जणांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडन ३ गावठी कट्टे जे बनावटीचे होते. आणि जिवंत काडतुससह ७ लाख ६६ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा हि गुन्हेगारांना कस्टडी मधे घेऊन त्या आरोपी विरुद्ध शस्त्रबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोईटी सत्रासेन मार्गावर एका वाहनातून गावठी कट्ट्याची विनापरवाना वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होते. त्या आधारे 12 तारखेला संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील व कर्मचाऱ्यांनी भोईटी सत्रासेन रोडावर. सापळा लावला असता शेवरलेट गाडी येताना दिसली पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकांनी पोलिसांना बघून वाहन सुसाट वेगाने शिरपूरच्या दिशेने पळाला पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबवले आणि मुद्देमाला सोबत आरोपीना पकडले गुन्हेगारांना कस्टडी मधे घेऊन त्यांच्या विरुद्व पोलीस पाण्यात गुन्हा दाखल केला. संजय बारकुंड अप्पर पोलीस अधीक्षक, किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी, आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट व त्यांच्या साहाय्यकांनी हि कारवाही केली.
