भारत जोडो यात्रा हि भारतात मागील काही महिन्यापासून चर्चेचा विषय ठरत आहे ‘भारत जोडो’ यात्रा सध्या पंजाबमध्ये सुरु आहे. आज यात्रे दरम्यान दुख:द घटना घडली काँग्रेसचे खासदार संतोख सिंग चौधरी यांचे हृदयविकाराने आज पंजाब भारत जोडो यात्रेत आज निधन झाले. सकाळी फिलूर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला तेव्हा संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती बिघडली त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
संतोख सिंग चौधरी यांना हृदयविकाराच्या झटका आला असे डॉक्टरांनी माहिती दिली. पण मात्र उपचारा दरम्यान संतोष सिंह यांचा मृत्यू झाला.
संतोख सिंह चौधरी हे पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. संतोख सिंह चौधरी हे पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. संतोख सिंह चौधरी यांचा जन्म १८ जून १९४६ रोजी पंजाबमधील जालंधरच्या धालीवाल येथे झाला.संतोख सिंह चौधरी यांच्या निधनाणे भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. संतोख सिंह चौधरी यांचा निधन झाल्याने काँग्रेसचे अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
या आदी गेल्या दोन महिन्यापूर्वी भारत जोडो यात्रेत नांदेड येथील काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. कृष्ण कुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केलं. त्याच दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती.