नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मुले राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज ११:३० ला चा प्रकार घडला. नागपुरातील त्यांच्या कार्यलायत धमकीचे ३ वेळा फोन आले. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी पर्याप्त सुरक्षा असणार आहे. सायबर टीमच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे’, असं पोलीस उपायुक्त मदाने यांनी सांगितलं.
