लातूर : जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एसटी बसचा रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली उलटली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास लातूरहून एम. एच.२० बी. एल.२३७३ ही बस पुणे जाण्यासाठी ३० प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस बोरगाव काळे या गावाजवळ आली आणि बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि या अपघातात एसटीतील ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी १४ प्रवाशी गंभीर असून त्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिसरात हि घटना पहिली नाही या आदी हि अपघात झालेले आहेत आणि बळी हि गेले आहेत.