बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड,पाच महिलासह आठ जणांना अटक

विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून मग नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत पाच महिलांसह आठ जणांना अटक केली आहे. नवरी मुलगी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. कुरुंदवाड परिसरातील दोन युवकांना लाखो रुपयांचा चुना या टोळीने लावला होता. यानंतर या तरुणांनी कुरुंदवाड पोलिसात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने राज्यभरात अनेकांना गंडा घातल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.वर्षा बजरंग जाधव, संध्या विजय सुपनेकर, ज्ञानबा रामचंद्र दवंड ऊर्फ संतोष सुतार, विश्वजीत बजरंग जाधव, शारदा ज्ञानदा दवंड, दीपाली केतन बेलोरे आणि रेखा गंगाधर कांबळे अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.हाय्यक फौजदार व्ही. आर. घाटगे, हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण, सागर खाडे, पोलीस अंमलदार पूजा आठवले, ज्योती मुंडे यांच्या पथकाने कसून शोध घेत लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीसह आठ आरोपींना अटक केले. नवरी मुलगी फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares