पोलिसांच्या समोर भाईच्या समर्थकांचा जल्लोष,गुन्हा दाखल

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. त्यांची काही नियम आणि अटीवर सुटका करण्यात आलेली असतांना नाशिकरोड कारागृहाच्या बाहेर गंभीर घटना घडली आहे.आरोपीचं सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी एक नवीन पायंडा पडू लागला आहे. कारागृहतून एखाद्या गुंडाची किंवा भाईची सुटका झाली कि जल्लोष करणे, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करणे असे प्रकार समोर येऊ लागले आहे. नाशिकच्या जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. आ गये भाई बाहर असे म्हणत अनेकांनी व्हिडिओ काढत जल्लोष केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील कारागृहातून जामीनावर आणि न्यायालयाच्या निकालानंतर सुटका केली. त्यामध्ये शाहरूख रज्जाक शेख याचीही सुटका करण्यात आली. शाहरुख मूळचा नगरजिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील आहे. त्याची सुटका झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.कारागृहाच्या बाहेर जल्लोष आणि नियमांचे पालन न केल्यानं नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares