फळ विक्रेत्याची 2 मुलांसह आत्महत्या; 21 सावकारांवर गुन्हा, 10 जणांना बेड्या

नाशिकच्या सातपूर परिसरात एका फळ विक्रेत्यांने आपल्या दोन मुलांसह सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिराेडे कुटूंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामध्ये पित्यासह दाेन सख्या भावाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने परिसरावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान शिराेडे पिता पुत्रांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समाेर आली आहे.

सामुहिकरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला असून या प्रकरणी आता 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रतिभा दीपक शिरुडे (वय 45) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एम. आर. धामणे, राजाराम दा. काळे, मुकेश भि. लोहार, भास्कर सोनवणे, मुकेश सोनवणे, शांताराम नागरे (रा. पिंपळगाव), संजू पाटील, शेखर पवार (दोघे रा. शिवाजीनगर), प्रकाश व्ही. गोरे, नलिनीताई शेलार, बाविस्कर साहेब (रा. अशोकनगर, कैलास गोन्हाणे, भूषण चौधरी, गरीबनवाज, भरत वनजी पाटील, किरण बोडके, गिरीश खटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे व शरद पिंगळे या 21 खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares