दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना येवला-कोपरगाव रस्त्यावर घडली. अशपाक इब्राहिम शाह असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. नानासाहेब गुळवे असे अपघातातील जखमी मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. जखमीवर येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर, त्याला कोपरगाव येथे पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशपाकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.मयत अशपाक इब्राहिम शाह हा येवला येथील रहिवाशी असून, व्यवसायाने मिस्त्री आहे. कोपरगाव येथून काम आटोपून आपल्या मोटारसायकलने येवला येथे घराकडे चालला होता. जखमी नानासाहेब गुळवे हा कोपरगाव तालुक्यातील डाऊच येथील रहिवासी असून, येवला येथून घराकडे जात होता.
