एक पांढऱ्या रंगाच्या कारमधून शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक निसरीक्षक सुरेश शिरसाठ याना मिळाली . त्यांनी तात्काळ फिल्डिंग लावून मुंबई आग्रा महामार्गावरील सीमा तपासणी नाका हाडाखेड येथे नाकाबंदी करून या कर ला अडवले या कार मधून १२ तलवारी २ गुप्ती १ चॉपर बटन चाकू २ फायटर आणि कर सह सुमारे ६ लाख २९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित हे ट्रॅक्टर मालक चालक आणि मजूर आहेत. धुळे तालुक्यातीळ अवधान लळींग जुन्नेर या गावातील हे रहिवासी असून १० जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयित आरोपींमध्ये सतपाल गिरीधर सोनावणे, किरण नंदलाल मराठे, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार , सचिन राजेंद्र सोनावणे , राजू अशोक पवार , विशाल व्हीव्हीआज्य ठाकरे , संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण आणि विठ्ठल हरबा सोनावणे यांचा समावेश आहे या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले ,
लळींग जुन्नेर सारख्या ग्रामीण भागातील त्यातही ट्रॅक्टर चालक आणि मजुरी करणाऱ्या या तरुणांना एवढ्या शस्र्तांची गरज का ? इतर कुणाच्या सांगण्यावरून शास्त्रांची हि तस्करी होते आहे काय ? या पूर्वी हि त्यांनी अश्या प्रकारे शास्त्रांची तस्करी केली आहे काय ?सगळ्यात महत्वाचे म्हणजे धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणण्याची गरज काय या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे