निजामपूर-साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील खोरी गावाच्या परिसरात झालेल्या अवकाळी वादळी वार्यासह गारपिटीने झालेल्या पावसाने शेकडो एकर क्षेत्रातील कांदा ,हरभरा,गहु,पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.आधीच आर्थिक टंचाई असलेल्या शेतकर्याचा या गारपिठ पावसामुळे तोडचा घास हिसकावला आहे.कापणीवर आलेला गहु हरभरा तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी या संकटामुळे ह
तबल झालेला असुन शासनाच्या महसुल कृषी विभागाने तादकाळ पंचनामे करुन नुकसान ग्रस्त शेतकर्याना आर्थिक मदत दयावी अशी मागणी शेतकर्यानी केली आहे. आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास माळमाथा वरील परिसरात वादळी वार्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली.या जोरदार झालेल्या पावसात खोरी परिसरात प्रंचड गारपिठ झाल्याने खोरी परिसरातील शेतानमध्ये गाराचा थर साचला यामुळे रब्बी हगामातील गहु, हरभरा हि पिके काढणीवर आली असताना मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.तसेच कांदा पिकाचे हि या गारपिठ पावसामुळे नुकसान झाल्याने काढणी वर आलेला कांदा आता सडून नुकसान होईल या पावसाने रब्बी पिंकाचे मोठे नुकसान झाल्याने आधीच आडचणीत असलेला शेतकरी हातचे रब्बी पिंकाचे नुकसान झाल्याने पुन्हा अडचणीत आला आहे. या अवकाळी पावसाने खोरी सह टिटाणे ,इंदवे,निजामपूर ,जैताणेसह माळमाथा परिसरात रब्बी हगामातील पिंकाचे मोठे नुकसान केले असुन खोरी टिटाणे परिसरात प्रंचड मोठी गारपिठ झाल्याने या परिसरातील शेकडो एकर शेतात गाराचा थर साचलाने नगदि पिकाचे मोठे नुकसान झाल्याने. निजामपूर जैताणे परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने नगदि उत्पादन देणारी कांदा गहु हरभरा या काढणी वर आलेल्या पिंकाचे नुकसान दिसुन येत आहे तसेच विटभट्टी इतर हि व्यावसायिकांचे या पावसामुळे खुपच धावपळ झाली असुन त्यांना हि अवकांळी पावसाचा फटका झाला आहे.ईदंवे शिवारात दुसर्यादा अवकाळी पावसाचे नुकसान झाल्याने शेतकर्यानवर सुलतानी संकट आलेले आहे.माळमाथा परिसरातील खोरी ,टिटाणे,इदंवे,दुसाणे येथे आधिच कापुस भरलेला आहे त्याला भाव ही नाही सलग दोन दिवस पडणार्या अवकाळी वादळी वार्यासह प्रचंड गाराचा वर्षाव झांल्याने नगदि काढणीवर आलेला गहु हरभरा कांदा पिंकाचे मोठे नुकसान झालेले आहे.गारपिठमुळे झालेल्या पावसामूळे शेतात असलेले इदंवे येथील शेतकरी अमीत पाटिल यांना हे नुकसान बघून गहिवरुन आले. या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेकडो एकर शेतातील गहु हरभरा,कांदा पिंकाचे मोठया प्रमाणात झालेल्या नुकसानीचे शासनाच्या महसुल कुषी विभागाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्त शेतकर्याना भरपाई मिळुन दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.