महाराष्ट्र राज्य हे महापुरुषांचं आणि साधुसंतांचं असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या जल्लोषात साजरा केला जातात. विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. डीजे डॉल्बीच्या तालावर तरुणाईचा जल्लोषही बघायला मिळत असतो. अनेक ठिकाणी व्याख्यान आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमही केले जातात. हेच कार्यक्रम करत असताना वर्गणी गोळा केली जाते. त्यासाठी पावती पुस्तक छापून अनेक जण सक्तीने वसुली करत असतात. त्यावरून बऱ्याच ठिकाणी वादही होतात. मात्र, पोलिसांपर्यंत हे वाद न पोहोचता सामंज्यसपणाने वाद मिटवले जातात. त्यामुळे कारवाई शक्यतो टळली जाते. हीच बाब नाशिक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर आता पोलिसांनी गंभीर इशारा दिला आहे.दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी वर्गणी गोळा केली जाते आहे. मात्र, वर्गणी गोळा करत असताना जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल केली जात असल्याच्या काही तक्रारी पोलिसांच्या कानावर पडल्या आहेत.
सक्तीने वर्गणी वसूल करत असताना कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वादही झाल्याचे समोर आला आहे. मात्र, सक्तीच्या वर्गणी वसूलीचा वाद तिथेच मिटवण्यात आला पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला नाही.