नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या घटनेनंतर मंदिर समितीने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आता या प्रकरणी साधू महंत आक्रमक झाले आहे. महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले की, त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की भाईचाऱ्याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची परवानगी द्यावी, अन्यथा ही नोंटकी बंद करावी, असे अनिकेतशास्त्री यांनी म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी साधू महंत आक्रमक झाले आहेत.