सिडकोत 25 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई.सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी व टवाळखोरांवर कार्यवाही करण्यासाठी अंबड पोलिसांनी कंबर कसली असून सिडकोतील चौकाचौकात, उद्यानात तसेच मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांवर अंबड पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.सोमवारी (ता. १२) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही महिन्यांपासून सिडको परिसरातील विविध भागात टवाळखोरांनी उपद्रव केला आहे. दिवसेंदिवस हाणामारी मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्या आहे.महिलांची छेडछाड, रस्त्याने होणारी आरडाओरड, उद्यानांमध्ये बसणारे मद्यपी, तसेच रस्त्याने शिवीगाळ करणाऱ्या मोकाट टवाळखोरांवर सोमवारी सायंकाळी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईत तब्बल २५ टवाळखोरांना ताब्यात घेतले. सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले तसेच कर्मचाऱ्यांनी केली आहे.
प्रतिनिधी प्रमोद भट,नाशिक
