कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती पाहा मी सल्ला देईल. उद्योगपतींमध्येही ती पद्धत आहे. मग तुम्ही ती पद्धत का अवलंबत नाही, असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला. माझी अजून माझ्या पांडुरंगला विनंती आहे , आम्हाला आशीर्वाद द्यावे, त्यांनी थांबावे, असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी शरद पवार यांना केले.
२०१४ मध्ये एकदा भाजपाची सत्ता नसताना भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं १६ जागा राष्ट्रवादी, १६ शिवसेना आणि १६ भाजपा असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र भाजपाने काही गोष्टी मागे घेतल्या. २०१४ ला भाजपाची सत्ता आली. भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. जो समन्वय असला पाहिजे तो झाला नाही. विरोधी पक्षात बसावं लागलं. पण आपण खूप पुढे गेलो नाही. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे बहुमत प्रचंड आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.