सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा- धडगाव रस्त्याची ओळख आहे.मात्र या रस्त्यात असलेल्या चांदसैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसंखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दगड कोसळण्याची व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यादृष्टीने हा मार्ग आता महिनाभर बंद राहणार आहे.
नंदूरबार- तळोदा- धडगाव मार्गावर असलेल्या चांदसैली घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड प्रतिबंधक उपाययोजनांचे कामासाठी साधारण महिनाभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक शहाद्याकडून वळविली आहे.