झेप ब्रेकिंग : जागतिक आदिवासी दिनाचे लावलेले बॅनर फाडल्यावरून चारणपाड्यात दोन गट भिडले. तुफान दगडफेक करीत रस्ता रोको करण्यात आला. आमदार कांशीराम पावरा हे घटनास्थळी पोहचले, पण आदिवासी बांधवांना न भेटता आधी समोरच्या गटाला भेटल्याने संतप्त आदिवासिनी आमदारांची गाडी फोडून उलटी केली. तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करीत त्यांचे नुकसान करण्यात आले. दुपारनंतर सुरू झलेला हा प्रकार अजूनही सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झले आहेत. जास्तीची कुमक बोलविण्यात आली आहे .