लक्ष्मी नगर परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांच्या मुद्देमालावर केला हात साफ.धुळे शहरातील लक्ष्मी नगर येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घराचा कुलूप कोंडा तोडून रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाख रुपयांच्या मुद्देमारावर डल्ला मारून पोबारा केला आहे, घर मालक हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते एकच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी कोंडा तोडून आत शिरकाव केला व घरातल्या कपाटातील 15 तोळे सोने, दहा हजार रुपये रोकड, तसेच जर्मन चलन दोन हजार रुपयांचे असा संपूर्ण लाखो रुपयांचे सोने चांदीसह चोरट्यांनी लंपास केले आहे. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होत त्यांनी विविध तपास यंत्रणेसह या चोरीचा तपास सुरू केला आहे परंतु दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.