जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.. विशेष म्हणजे या महमरगावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरनाणे नव्याने उभारलेला हा टोलनाका आज १ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार होता.. प्रत्यक्ष सुरु होण्याच्या काही तास आधीच कॅबिन जाळून त्याचे नुकसान करण्यात आले.
समजलेल्या माहिती नुसार या टोलनाक्याला तालुक्यातील स्थानिक नागरिकांचा विरोध होता .. टोलचे दर कमी करण्याची हि नागरिकांनी मागणी होती.. या सद्नर्भात रविवारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते… सुरु होण्याआधीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे..