सामाजिक समता सप्ताहा निमित्ताने’11 एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन

*‘सामाजिक समता सप्ताहा निमित्ताने’11 एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 6 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती,नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सोमवार 11 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता गुगल मीट ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.अर्जदारांची कार्यालयात गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता शासनाने ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी जात पडताळणीसाठी अर्ज कसे सादर करावे,अर्ज सादर करतांना कोणते दस्तऐवज जोडावे. तसेच ज्या अर्जदारांना त्रृटी पूर्ततेबाबत एसएमएस व ई-मेल आले आहे.अशांनी त्रृटींची पुर्तता.जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन गुगल मिट ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे.यावे बिनारमध्ये सहभागी होण्यासाठी link: meet.google.com/hqe-dsun-ewo ही लिंक करुन देण्यात आली आहे. तरी सर्व प्राचार्य,कर्मचारी, मुख्याध्यापक विद्यार्थी, इंटरनेट कॅफे चालक, पालकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन प्राची वाजे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top